…तर भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी करणार

0

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. एनसीबीची (नार्कोटीक कंट्रोल ब्युरो) चौकशीसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याकरता केली गेली आणि ती फार्सच ठरली. या प्रकरणात भाजपाचा ड्रग अँगल आला होता आणि मोदींच्या बायोपीक निर्मात्यांचे नावही चर्चेत आले होते म्हणून बॉलीवूड व भाजपा ड्रग कनेक्शनची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी आज शुक्रवार कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. दरम्यान याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एनसीबीला पत्र देणार आहे, त्यांनी चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस याचा तपास करेल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

बॉलीवूड अभिनेते विवेक ऑबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आदित्य अल्वा याच्यावर ड्रग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो फरार असल्याने पोलिसांनी विवेक ऑबेरॉयच्या मुंबई येथील घरावर छापेमारी केली होती. विवेक ऑबेरॉय हे भाजपचे स्टार प्रचारक राहिलेले आहे, त्यांनी मोदींचा बायोपीक केला होता, त्याच अनुषंगाने भाजप नेत्यांची चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

ड्रग प्रकरणी तपास करण्याचा अधिकार एनसीबीला (नार्कोटीक कंट्रोल ब्युरो) आहे. मात्र त्यांनी तपास केला नाही तर मुंबई पोलीस हा तपास करेल असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Copy