…तर नोटा होणार बाद

0

मुंबई ।  तुम्ही जर होळी खेळण्याचा विचार करत असाल तर सांभाळूण, होळीच्या नादात नोटा रंगल्या तर त्या बाद होणार आहेत. त्यामुळे होळी खेळत असताना खिशात नोटा ठेवू नका, कारण 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर होळीचा रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाहीत. होळीच्या रंगात रंगलेल्या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातच जमा करता येणार आहेत. आरबीआयने क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत ही गाइड लाइन जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर याचे मॅसेजही व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर फिरत असलेले हे मॅसेजमध्ये तथ्य असल्याच्या वृत्ताला बँक अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. आरबीआयकडून ही गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर रंग किंवा पेनाने काही लिहिले असल्यास त्या नोटा बँकेत जमा करण्यात येणार नाही, अशी माहिती दिल्लीतल्या सेक्टर 16 मधल्या पंजाब अँड सिंड बँकेचे चीफ मॅनेजर अनिल कुमार यांनी दिली आहे.