…तर चीन काश्मीर प्रश्‍नामध्ये हस्तक्षेप करेल

0

नवी दिल्ली – दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौर्‍यामुळे चीनचा तीळपापड सुरूच आहे. चीनच्या सरकारने माध्यमांचा वापर करून भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.

82 वर्षीय तिबेटियन प्रमुख दलाई लामा यांचे उदात्तीकरण कराल, तर चीन भारताच्या काश्मीर प्रश्‍नामध्ये हस्तक्षेप करेल, अशी थेट धमकीच चीनने प्रसार माध्यमांच्या साहाय्याने भारताला आज दिली.