…तर घराबाहेर पडणार्‍यांना गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील

0

हैदराबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचाा आदेश असताना नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन न करत घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहेत. परंतु आता नागरिक असचे बेजबाबदारपणे वागल्यास सरकारकडे गोळी घालण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे वादग्रस्त विधान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे.


के. चंद्रशेखर राव म्हणाले की, अमेरिकेला लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे राज्यातही लॉकडाऊन लागू केल्यानंतर नागरिक अत्यावश्यक काम नसतानाही घराबाहेर निघत असतील तर मला २४ तास राज्यात कर्फ्यू लागू करावा लागेल. तसेच नागरिक रस्त्यावर फिरत असल्यास त्यांना दिसताक्षणीच गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यास सरकारला भाग पाडू नका असे चंद्रशेखर राव यांनी यावेळी म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन असताना देखील नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने के. चंद्रशेखर राव यांना नाराजी व्यक्त केली आहे.


चंद्रशेखर राव पेट्रोल पंप बंद करण्याचा आणि रस्त्यावर फिरणार्‍या लोकांना रोखण्यासाठी सैन्याची मदत घेण्यासंबंधित विचार करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. रात्री ७ वाजल्यापासून सकाळी ६ पर्यत कर्फ्यू लागू असणार असून सर्व दुकानं सायंकाळी ६ पर्यत बंद करण्याचे आदेश के. चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत.