तर्‍हाडी येथे महिलेस जातीवाचक शिवीगाळ, मारहाण

0

13 जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
शिरपूर :तालुक्यातील तर्‍हाडी येथे एका आदिवासी महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करून गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी, 27 एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तर्‍हाडी येथील 13 जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे, तर्‍हाडी येथील कल्पनाबाई भ्र.आसाराम भिल (वय 45) या महिलेच्या फिर्यादीनुसार सुनील बुधा पाकळे, अनिल बुधा पाकळे, प्रशांत सुनील धनगर, किरण रमेश भलकार, आनंदा धनगर, राहुल महारु धनगर, राकेश महारु धनगर, दिनेश दिलीप धनगर, प्रवीण युवराज धनगर, तुळशिराम भाईदास भामरे ऊर्फ भिका जिभाऊ, जयेश तुळशिराम भामरे, ललित तुळशिराम भामरे, चेतन पुंडलिक भामरे (सर्व रा. तर्‍हाडी त.त.) यांनी 27 रोजी सायंकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास गावातील भिलाटीमधील फिर्यादीच्या राहत्या घराच्यासमोर घरी गर्दी करुन आले.
फिर्यादीस तुम्ही कोरोनामध्ये दारु विकतात. त्यावर फिर्यादी व फिर्यादीचे पती यांनी आरोपीतांना समजावुन सांगितले की, आम्ही दारु विकत नाही तरी तुम्ही आमचे घरी का आले? असे बोलण्याचा राग आल्याने आरोपींनी कल्पनाबाई आसाराम भिल, आसाराम भिल, लता भिल, सुनील युवराज भिल, मोहन युवराज भील, बापु रतन भिल यांना लज्जा वाटेल असे कृत्य करत जातीवाचक शिवीगाळ करून गळा दाबुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाकडी व प्लास्टिक दांड्याने मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 13 संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने करीत आहेत.

Copy