तर्‍हाडी विकासोची निवडणूक बिनविरोध

शिरपूर। तालुक्यातील तर्‍हाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जाहीर झाली. तालुक्यातील तर्‍हाडी येथील विविध कार्यकारी सहकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सर्वसाधारण जागांसाठी आठ, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती एक, महिला प्रतिनिधी 2, भटक्या विमुक्त जमाती 1 व इतर मागासवर्गीय एक असे 13 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. सहा एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. अंतिम दिवशी संजय शांतीलाल पाटील, शिवाजी निंबा पाटील, प्रकाश वगर पाटील, दादाभाई रामदास भिल, शशीकांत नामदेव पाटील, सुभाष खुशाल पाटील, ज्ञानेश्वर बन्सीलाल पाटील, सुनील विनायक पाटील हे सर्व साधारण जागासाठी तर जयश्री रावसाहेब चव्हाण, बेबीबाई नथा न्हावी हे महिला प्रतिनिधी म्हणून तर प्रा.प्रशांत दंगल पाटील इतर मागासवर्गीय, प्रा.उदय कुमार सुदाम भलकार भटक्या विमुक्त जमातीसाठी व दिलीप गंभीर अहिरे अनुसूचित जातीसाठी यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय शिरपूर येथे दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी.पाटील, सचिव सुधाकर विसपुते यांनी काम पाहिले.