तरूण संपादकाला मुकल्याने मोठी हानी

0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शोकसंदेश

जळगाव: सिध्दीविनायक गृपचे चेअरमन आणि वृत्तपत्र क्षेत्रात मोठे नाव असलेल्या दै. जनशक्तिचे मुख्य संपादक कुंदन ढाके यांचे अकाली जाणे हे मनाला चटका लावणारे आहे. पत्रकारीतेतील एक हिरा त्यांच्या रूपाने आपण गमावला आहे. एक अत्यंत तरूण संपादक म्हणून त्यांनी संपादकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटविला होता. आपल्या जिल्ह्यातील एका व्यक्तीने पुण्यासारख्या शहरात जाऊन स्वत:च्या ताकदीवर घेतलेली भरारी ही निश्चीतच हेवा वाटणारी आहे. दै. जनशक्तिच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार्‍या अशा तरूण संपादकाला आपण मुकल्याने समाजाची मोठी हानी झाली असल्याचा शोक संदेश राज्याचे पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.