तरूणीला पाठविले अश्‍लील फोटो

0
पिंपरी : एका तरूणाने फेसबुकवर मुलीच्या नावे फेक अकाऊंट उघडून त्याद्वारे तरूणीला फ्रेन्ड रिकवेस्ट पाठवून तरूणीला तिचे अश्‍लील फोटो तयार करून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपरी येथे गुरूवारी उघडकीस आला. याप्रकरणी 33 वर्षीय तरूणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहेल (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुहेल याने फिर्यादीला रूहि सिंग नावाने फेक अकाऊंटवरुवन  फ्रेन्ड रिकवेस्ट पाठविली. ती फिर्यादीने स्वीकारल्यानंतर त्याद्वारे तिचे अश्‍लील फोटो तयार करून ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे तपास करत आहेत.