तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव । जळगाव तालुक्यातील कडगाव येथील तरूणाने मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कडगाव येथील विजय सिताराम पाटील (वय 40) यांनी मंगळवारी पहाटे सर्व कुटुंबीय झोपत असताना छताला दोरीच्या सहायाने गळफास घेतला.

पहाटे 5 वाजेच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय उठल्यानंतर विजय पाटील यांनी गळफास घेतलेला प्रकार उघडकीस आला. त्यांना तत्काळ खाली उतरवून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र विजय पाटील यांच्या आत्महत्ये मागचे कारण कळू शकले नाही.