Private Advt

तरूणाचा मोबाईल लांबवला

जळगाव-  पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सिंधी कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमित नरसिंग पावरा (वय-२७) रा. एम. जे. कॉलेज जवळ जळगाव हा तरुण रविवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीकडून कंजरवाडा कडे पायी जात असताना त्याच्या मागून अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन तरूणाच्या हातातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल झटका मारून बळजबरीने हिसकावून लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री १० वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करत आहे.