तरूणाकडून तरूणीचा वियनभंग; पोलीसात गुन्हा

0

जळगाव- सायंकाळी क्लासला जात असलेल्या तरुणीला लज्जास्पद कृत्य करत अश्‍लील शिवीगाळ करून कारण नसतांनाही कानशिलात लगवून विनयभंग केल्याप्रकरणी एका तरूणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात विनभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील इंद्रपस्थ नगर येथील तरूणी बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे क्लास असल्याने सायकलने जात होती. सुरत रेल्वेगेट ओल्यांडल्यानंतर मकरा अपार्टमेंटजवळून जात असतांना रस्यावर उभा असलेला लल्ला बेंडवाल याने तरूणीस भाजीवाली अशी दोन ते तीन वेळा आरोडी मारली. यानंतर तरूणीने त्याला याचा जाब विचारला असता तरूणाने अश्‍लील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यानंतर तरूणीचा हात पकडून तीच्या कानशिलात लगावली व जा पोलीसांना सांग मी घाबरत नाही अशी धमकीही दिली. तरूणीने तात्काळ घरी जावून आई-वडीलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत लल्ला बेंडवाल यांच्याविरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार लल्ला बेंडवाल याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.