तरुणीची गळफास घेवून आत्म्हत्या

मुक्ताईनगर : शहरातील तेजस्विनी संजय माळी (17) या तरुणीने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5.20 वाजता उघडकीस आली. तरुणीने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. महेंद्र रमेश माळी (रा.मुक्ताईनगर) यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास हवालदार सादिक पटवे करत आहे. मृत तेजस्विनी ही भाजपचे माजी तालुका सरचिटणीस संजय माळी यांची कन्या तर पंचायत समितीचे माजी सभापती राजू माळी यांची पुतणी आहे.

Copy