Private Advt

तरुणींशी प्रेमसंबंध निर्माण करीत पळवून नेणारा मजनू जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

कल्याणमधून आवळल्या मुसक्या : भुसावळ तालुक्यातील पळवून नेल्यप्रकरणी कारवाई, अल्पवयीन तरुणी सहा महिन्यांची गर्भवती

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध निर्माण करीत फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. कृष्णा महादेव गोरे (24, के.एम.पार्क, स्वामी समर्थ शाळेच्यामागे, गुरूदत्त कॉलनी, कुसुंबे, ता.जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पीडीता अत्याचारातून सहा महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे तर आरोपीने यापूर्वीदेखील एका 17 वर्षीय युवतीला फुस लावून पळवून नेले होते व नंतर तरुणी सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी लग्न करून घरी सोडले होते. या प्रकरणी आरोपीविरोधात जिल्हापेठ पोलिसात दाखल करण्यात आला होता. यानंतर 9 नोव्हेंबर 2021 रोजी ही तरुणी मयत झाली होती.

आरोपीच्या अखेर आवळल्या मुसक्या
भुसावळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता. तक्रारदारांनी मुलीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक बाबींच्या सहाय्याने कल्याण, जि.ठाणे येथे जावून आरोपीच्या भाडे तत्वावरील घरातून मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीसोबत पीडीतादेखील असल्याने तिला ताब्यात घेण्यात आले मात्र पीडीता सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, योगीता पाचपांडे, चालक मुरलीधर बारी आदींच्या पथकाने केली.