तरुणींची सुरक्षा वार्‍यावर

0

जळगाव । शहरात रोड रोमिओची उच्छाद महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर दिसून येत असतांना पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे शहरातील विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक महाविद्यालयात प्रवेशद्वारातच ओळखपत्र सक्ती अद्यापपर्यंत केली गेलेली नाही. कॉलेजमध्ये येण्याजाणार्‍यांची संख्या जास्त आहे. सदरी व्यक्त महाविद्यालयातीलच आहे की नाही यासाठी ओळखपत्र तपासणी सक्ती करण्याची गरज महाविद्यालयांना आहे. याबाबत पाडताळणीसाठी नंतर महाविद्यालयातील मागची नेमकी भुमीका व समस्या काय आहे? हा मांडण्याचा उद्देश जनशक्ती टीमचा आहे. अनेक वेळा महाविद्यालयीन तरुणीसोबत छेड काढण्याचे प्रकार या ठिकाणी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या आवारात टवाळखोर व रोडरोमिओ टोळी करून बसलेलं असतात. मग पोलीस प्रशासन कार्यवाही करीत का नाही? असा सवाल सर्वसामान्य नागरीकांना उपस्थित होत आहे.

महाविद्यालयीन परिसरात टवाळखोरांचा अड्डा

जी.डी.बेडाळे महाविद्यालय, नंदिनीबाई मुलीचे विद्यालय, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे नूतन मराठा कॉलेज, आर.आर. विद्यालय, ला.ना.विद्यालय, सु.ग. देवकर विद्यालय व अनेक क्लासेस वर्ग शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या परिसरात आहे. यामध्ये येणार्‍या जाणार्‍या तरुणीवर रोडरोमिओ लक्ष ठेऊन राहतात. घरून निघालेल्या मुलींच्या सुरक्षेबाबत नेहमी चिंता असल्यामुळे पालकांकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहराची संपूर्ण सुरक्षेची जबादारी पोलिसांवर असतांना रोड रोमिओची मनस्ताप दिवसेंदिवस कशी वाढते ? असा प्रश्‍न पालकांसह सर्वसामान्य नागरीकांमधून होत आहे.

विद्यार्थीनींना फसविण्याचे कारस्थान

महाविद्यालयात येणार्‍या तरूण, तरुणीची संख्या या ठिकाणी अधिक असते. या महाविद्यालयीन तरुणींना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी रोड रोमिओ तरुणीच्या एकट्या पणाचा फायदा घेऊन रस्त्यात अडवितात. आपल्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करतात रोडरोमिओ मध्ये टवाळखोर तरुणांची संख्या अधिक असून छेड काढण्यासाठी स्पोर्ट बाईकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. या करिता कोणताही दबावाला महाविद्यालय तरुणींना बळी न पडता आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांना किंवा आपल्या पाल्याकडे तक्रार करायची आहे खास तरुणींना रोड रोमिओंपासून सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

निर्भया पथकाच्या कार्यावर प्रश्‍नचिन्ह

शहरातील महिलांसह महिलांच्या व महाविद्यालयीन भागातील तरुणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी दक्षता घेऊन निर्भया नावाचे विशेष पथक सुरु केले. यामध्ये महिला अधिकार्‍यांची देखील नियुक्ती तसेच एक वाहन देण्यात आले होते. निर्भया पथक सुरु झाल्यानंतर बर्‍याच ठिकाणी कार्यवाही झाली. मात्र आता सुरु असलेल्या रोड रोमिओची दादागिरी थांबविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे निर्भया पथक आहे कुठे? महिला छेडछानी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. वेळेवर निर्भया पथक नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहे. निर्भया पथकाचा धाक आता रोडरोमिओ ना असल्याचे स्पष्ट होत असतांना दिसून येत आहे. निर्भया पथकाचे कर्मचारी पथकाची गाडी आपल्या पद्धतीने वाटेल त्याठिकाणी आपल्या खासगी कामासाठी वापर केला जात असल्याचीही ओरड नागरीकांकडून होत आहे.

व्यापार्‍यांची रोजची डोकेदुखी

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील व्यापार्‍यांना रोडरोमिओचा त्रास म्हणजे डोकेदुखी ठरत आहे. कायम होत असलेल्या वादामुळे ग्राहक येत नसल्याचे वस्तू विक्री देखील परिणाम झाला आहे. शहरातील अनेक वृत्तपत्रांनी देखील या बाबत आवाज उठविला असता तात्पुरता कार्यवाही करण्यात आली. रोड रोमिओ नेहमी जोराने होर्न, वाहने चालवीत मुलीची छेड काढताना दिसत असून क्रीडा संकुलाच्या भागात बसून टवाळखोरी च्या प्रकारात रोड रोमिओ आघाडी वर आहे