तरुणावर ब्लेडने वार

0
चिंचवड : घरात झोपलेल्या तरुणाच्या गळयावर ब्लेडने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी इंदिरा नगर येथे घडली. मारुती राजू धोत्रे (वय 26, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार शंकर परशुराम हाडे (वय 26, रा.इंदिरानगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती आणि शंकर यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. शंकर हा मारुतीच्या आत्याच्या मुलगा आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग शंकर याच्या मनात होता. सोमवारी दुपारी मारुती इंदिरानगर येथे त्याच्या घरी दुपारी झोपला होता. त्यावेळी शंकर याने मारुतीच्या गळयावर ब्लेडने वार केले. यामध्ये मारुती गंभीर जखमी झाला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Copy