तरुणाला हटकल्याने विट मारुन केले जखमी

0

जळगाव । शहरातील डॉ. मिलींद कोल्हे हॉस्पीटल शेजारील जैन मंदिर मागील बाजूस एका गल्लीत काही मुलं मुली गप्पा मारीत असतांना एकाने हटकल्याने त्यांना राग आल्याने जमिनीवरील वीट उचलून डोक्यात मारून गंभीर जखमी केले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस स्थानकात अज्ञात मारेकर्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमी युगलातील एकाला बोलण्याचा आला राग
जैन मंदिर परिसरात असलेल्या डॉ. मिलींद कोल्हे हॉस्पीटलच्या मागील बाजूस आज 23 रोजी सकाळी 6.35 वाजेच्या सुमारास अनंत हौसिंग सोसायटी प्लॉट नं. 6 मध्ये राहणारे शिक्षक महेंद्र त्र्यंबक शिरोडे यांनी परिसरात उभे असलेल्या प्रेमी युगलाला तुम्ही येथे का गर्दी करीत आहात, इथे गर्दी करू नका हा बगीचा नाही असे म्हटल्यावर त्या प्रेमी युगलातील एकाला असे बोलण्याचा राग आल्याने त्याने महेंद्र यांना जमिनीवरील वीट उचलून डोक्यात मारून घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी त्यांच्याकडे मोटरसायकल क्र. एमएच 19- 777 यावरून पळ काढला. शिक्षक महेंद्र त्र्यंबक शिरोडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी तात्काळ सदरील घटना रामानंद नगर पोलिसांच्या निदर्शनास आणून अज्ञात मारेकार्‍यांविरूध्द कलम 337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. काशीनाथ कोळंबे करीत आहेत. यातील संशयीत आरोपींचा तपास पोलिस करीत आहेत.