तरुणाने बनविला तरुणीचा लपून छपून व्हिडीओ

0

 

जळगाव शहरातील धक्कादायक घटना

जळगाव– बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी शेजारची खोली दिली आहे. या खोलीतून बांधकाम करणार्‍या तरुणाने घरमालक तरुणीचा लपून छपून एक मिनिटाचा  व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी व्हिडीओ तयार करणार्‍या संशयित तरुण आसिफ बेग यास अटक केली आहे.

व्हिडीओ असलेले मेमरीकार्ड तरुणीला दिले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणी तिची आई तसेच भावासह वास्तव्यास आहे. त्याच्या घराशेजारी असलेल्या रहिवाशाचे बांधकाम सुरु आहे. सिमेंट वगैरे साहित्य ठेवण्यासाठी तरुणीच्या आईने बांधकाम कामगारांना खोली दिली. 17 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास 22 वर्षीय तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी घरात बांधकाम कामगार तरुण आला. त्याने तरुणीला मेमरी कार्ड दिले. तसेच त्यात तरुणीचे काही व्हिडीओ असल्याचे त्याने
सांगितले.

तरुणीला मेमरीकार्ड देणाराच निघाला संशयित
प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार आईला न कळविता, हा प्रकार फोनवरुन तिचे शेजारच्यांना कळविला. त्यानुसारचे शेजारचे आले. त्यांनी तरुणीला संबंधित मेमरी कार्डमधील व्हिडीओ तिच्या लॅपटॉपमध्ये तपासण्यास सांगितले असता, यात तरुणीचा एक मिनिटाचा  व्हिडीओ तयार केला असल्याचे दिसून आले. यानंतर तरुणीने या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तरुणीच्या घरी पोहचले. मेमरी कार्ड देणार्‍या आतिफ याकूब बेग वय 20 वर्ष रा. आझादनगर, पिंप्राळा हुडको याची चौकशी केली असता त्यानेच तरुणीचा  व्हिडीओ बनविला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तरुणीच्या फिर्यादीवरुन आसिफ याकूब बेग या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यातविनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या पथकाने केली अटक
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांचे माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल, मुकेश पाटील, हेमंत कडकर , चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, शांताराम पाटील या कर्मचार्‍यांनी संशयित तरुण आसिफ बेग यास अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भोई करीत आहे

Copy