Private Advt

तरुणाच्या खून प्रकरणी तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : ‘सिव्हिल’मध्ये दाखल असलेल्या मित्राला पाहण्यासाठी गेलेल्या सुरज ओतारी व अरुण गोसावी या दोघांवर शुक्रवार, 18 मार्च रोजी जमावाने चॉपरने हल्ला केला. सुरज ओतारी याच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना त्याचा गुरुवार, 31 मार्च रोजी मृत्यू झाला. या गुन्ह्यात शनिवारी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने भूषण विजय माळी (22, रा.तुकारामवाडी) व विक्की उर्फ हेमंत चौधरी (वय 20, रा. पिंप्राळा) या दोघांना कसारा (जि.नाशिक) येथून अटक केली तर एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने अक्षय उर्फ गंप्या नारायण राठोड (वय 20 रा.शंकर अप्पा नगर) याला अटक केली.