तरुणाचा मोबाईल लांबवणार्‍या चोरट्याला गुन्हे शाखेकडून बेड्या

Attal Mobile Thieves in Shirpur caught in Crime Branch’s net धुळे : शिरपूरातील तरुणाचा मोबाईल चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पवयीनासह अन्य एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आदित्य सुनील वाडीले (शिरपूर, जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

धुळे गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची
शिरपूरातील जगदीश अरविंद शिंदे (19, आशीर्वाद हॉस्पीटलजवळ, शिरपूर) या तरुणाचा 19 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजता मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणी शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे गुन्हे तांत्रिक विश्लेषण करून एका अल्पवयीन आरोपीसह आदित्य वाडीले याच्या मुसक्या आवळल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, हवालदार संजय पाटील, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल राठोड आदींच्या पथकाने केली.