तरुणाकडून दीड किलो गांजा जप्त

0

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

हिंजवडी : कापडी पिशवीमध्ये गांजा घेऊन जाणार्‍या तरुणाला अटक करून त्याच्याकडून 22 हजार 650 रुपये किमतीचा एक किलो 660 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडीमधील पांढरे वस्ती येथे केली. जुबेर मौला अत्तार (वय 29, रा. माळवडी, पुनावळे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांना माहिती मिळाली की, एक संशयित इसम हिंजवडीमधील पांढरे वस्ती येथे गांजा घेऊन जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हिंजवडी पांढरे वस्ती येथील कोयते वस्तीकडून काटे वस्तीकडे जाणार्‍या रोडवर एक तरुण संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे 22 हजार 650 रुपये किमतीचा एक किलो 660 ग्रॅम गांजा आढळून आला. यावरून त्याला अटक करून पुढील करवाईसाठी हिंजवडी पोलिसांकडे देण्यात आले.

पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस कर्मचारी वसंत मुळे, प्रदीप शेलार, राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, दादा धस, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे, पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने केली.

Copy