तब्बल 55 वर्षानंतर महाराणा आणि छत्रपतींचे वशंज आले एकत्र

0

सारंगखेडा : देशात महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, या दोन्ही घराण्यांचा एक मोठा इतिहास आहे. सन 1961 मध्ये उदयपूर येथे महाराणा प्रतापसिंह यांचे वशंज महाराजा भबुतसिंह यांनी राणी एलिझाबेथ आल्या असतांना प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे शिवाजी महाराज यांचे वशंज छत्रपती शहाजीराजे भोसले यांना बोलाविले होते. त्यानंतर तब्बल 55 वर्षानंतर नंदूरबार जिल्हयाचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून खा.छत्रपती संभाजी राजे भोसले आणि महाराणा प्रतापसिंह यांचे वशंज युवराज लक्ष्यराजसिंह मेवाड यांचा एकाच व्यासपिठावर आणण्याचा दुर्मिळ योग सारंगखेडा जि.नंदूरबार येथे घडवून आणला. या दुर्मिळ योगाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो संख्येने जनता उपस्थित होती.

५०० वर्षापासून भरतो घोडेबाजार
नंदूरबार जिल्हयातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमीत्ताने जगप्रसिध्द भव्य असा घोडेबाजार गेल्या 500 वर्षापासून भरतो. या घोडेबाजारात घोडे खरेदीसाठी वेगवेगळया प्रांतातील अश्वप्रेमी दरवर्षी येत असतात. अश्वांच्या विक्रीसाठी प्रसिध्द असणा-या या यात्रोत्सवात दरवर्षी कोटयावधी रूपयांची उलाढाल होत असते. म्हणून यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी याठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून चेतक फेस्टीवल आयोजित केला होता. त्याच्या वितरण समारंभासाठी महाराणा प्रतापसिंहजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंजांच्या हस्ते करण्यात आले.

रावल ठरले यशस्वी
कार्यक्रमाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक योग जुळविण्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यशस्वी झाले आहेत. महाराणा आणि छत्रपतींचे वशंज एकाच कार्यक्रमात येण्याचा हा दुर्मिळ योग तब्बल 55 वर्षानंतर आला याबाबत छत्रपती संभाजी राजे आणि आपल्या भाषणातून याची जाणिव देखील उपस्थितांना करून दिली. या कार्यक्रमाला चेतक महोत्सवचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, विक्रांत रावल आदी यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे घराण्यातील छत्रपती शहाजीराजे भोसले आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची सासुरवाडी असलेल्या नागोद संस्थानचे राजे महेंद्रकुमार ज्युदेव यांचे नातेसबंध देखील यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी अधोरेखीत केले.