तब्बल 27 दिवसानंतर पहिली बस निघाली

नवापूर –  बस आगारातून आज तब्बल 27 दिवसानंतर पहिली बस कडक पोलीस बंदोबस्तात सुरत येथे जाण्यासाठी निघाली
महाराष्ट्र शासनात एसटी महामंडळ विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून मागील 27 दिवसापासून नवापूर बस आगारात आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर नवापूर बस आगारातून एकही बस रवाना झालेली नव्हती मात्र आज तब्बल 27 दिवसानंतर नवापूर येथून गुजरात राज्यातील सुरत येथे जाण्यासाठी पहिली बस पोलिसांच्या कडक बंदोबस्तात वापूर बस आगारातून रवाना झाली यावेळी एसटी महामंडळाचे नवापूर आगारप्रमुख राजेंद्र अहिरे पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर पोलीस हेडकॉन्स्टेबल निजाम पाडवी,पंकज सुर्यवंशी, कैलास तावडे जगदिश सोनवणे आदी उपस्थित होते.नवापूर बस आगारातून सोमवारी सुरत साठी बस रवाना झाली मात्र संघटनेत कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरू असल्याची प्रतिक्रिया एस टी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी मागील 27 दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळेच सोमवारी नवापूर बस आगारातून सुरत साठी बस रवाना झाल्याचे बोलले जात होते मात्र एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नसून सर्व संघटित असल्याचे प्रतिक्रिया संपात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.नवापूर एस टी कर्मचारी यांचा संप एस टी आगार प्रवेश व्दारसमोर सुरु होता.आता संप करी कर्मचारी यांनी ५०० मिटर लांब नवापूर शहर प्रवेश व्दारा जवळ मंडप टाकुन बेमुद्दत संपावर बसले आहे.