‘तन्वीर सन्मान’ कन्नड अभिनेत्री बी. जयश्री यांना जाहीर

0

पुणे : रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘ तन्वीर सन्मान ‘ यावर्षी कन्नड अभिनेत्री, गायिका आणि दिगदर्शिका बी.जयश्री तर नाट्यधर्मी पुरस्कार प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे.

प्रतिष्ठान च्या कार्यवाह दीपा लागू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. येत्या 9 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी 6.30 वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. तन्वीर सन्मानाचे स्वरूप 1 लक्ष रुपये तर नाट्यधर्मी पुरस्काराचे स्वरूप 30 हजार रूपये आहे.

बी जयश्री यांनी ‘ मदर’, जो कुमार स्वामी’, टिंगरा बुधला’, ‘ अंतिमयात्रा’, ‘ लक्षापती राजन कथे’, यापैकी काही नाटक ‘ स्पदना’ या आपल्या संस्थेतर्फे त्यांनी सादर केली आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार,’ पद्मश्री’ सन्मान त्यांना मिळाला आहे. अतुल पेठे गेली 38 वर्षे लेखक, दिगदर्शक, अभिनेते अशा विविध भूमिकांमधून परिचित आहेत.’ वेटिंग फॉर गोदो’, ‘ सूर्य पाहिलेला माणूस’, ‘ उजळल्या दिशा’ ,’ सत्यशोधक, समाजस्वास्थ’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. तेंडुलकर आणि हिंसा’, ‘ कचराकोंडी’, नाट्यलेखक सतीश आळेकर हे त्यांनी दिग्दर्शित केलेले लघुपट आहेत.

Copy