तनुश्रीच्या बहीणीची उद्विग्न व्यथा!

0

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर छेडछाडीचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. यासाठी तनुश्रीला अनेक कलाकारांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. आता तनुश्रीची बहीण इशिता हीनेही तिची व्यथा मांडली आहे.

इशिताने एका मुलाखतीत बोलताना म्हटली, ‘२००८ साली ‘हॉर्न ओके’ चित्रपटाच्या सेटवर घडलेली घटना खरी आहे. त्यांनी तिच्याशी फक्त असभ्य वर्तनच केले नाही, तर तिला धमकवण्याचाही प्रयत्न केला होता. तिच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली होती, आणि ती मी स्वत: पाहिली आहे, या घटनेला जरी १० वर्षे पूर्ण झाले असले, तरी त्या घटनेच्या जखमा आजही आमच्या मनात ताज्या आहेत. त्या घटनेमुळे आमच्या सर्व कुटुंबावर परिणाम झाला होता. तनुश्रीने निदान आता याबाबत बोलण्यास सुरुवात तर केली’.

आता या प्रकरणात पुढे काय घडणार आणि कोणते नवे खुलासे होणार पाहुयात.