ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद

0

पुणे : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने वेंकिज उद्योग समुहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ढोल-ताशा पथकांनी येऊन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल या स्पर्धेची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्स आणि मार्व्हलस बुक ऑफ रेकॉडर्स या दोन अतिशय महत्वाच्या व जागतिक स्तरावर पहिल्या पाच बुक्समध्ये गणल्या जाणार्‍या या बुकमध्ये स्पर्धेची नोंद झाली आहे.

ट्रस्टला या जागतिक नोंदीचे प्रमाणपत्र आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच तमिळनाडूचे माजी गव्हर्नर कोनीजेटी रोसौया यांच्या हस्ते हैद्राबाद येथील पोट्टी श्रीरामुलु तेलगु युनिव्हर्सिटी येथे प्रदान करण्यात आले. यावेळी अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचे विश्‍वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी प्रमाणपत्र स्विकारले. प्रसाद गुरव, प्रविण बडदे, स्वप्निल बडदे, गिरीजा पाटील, नितीन गवळी हे यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धकांचा सहभाग

दहा वर्षांपासून वेंकिज उद्योग समुहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ढोल-ताशा पथकांच्या सहभागाचे प्रमाण कमी होते.

Copy