ड्रग्स प्रकरण: दीपिका पदुकोनच्या चौकशीला सुरुवात

0

मुंबई:अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. यामध्येच आता अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांचे नाव जोडले गेले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) दीपिका, श्रद्धा, रकुल प्रीतला चौकशीसाठी बोलविले आहे. काल शुक्रवारी रकुल प्रीत सिंह, दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी झाली. त्यानंतर आज शनिवारी २६ रोजी दीपिका पदुकोनला चौकशीसाठी प्रचारण करण्यात आले आहे. दीपिका चौकशीसाठी हजर झाली असून चौकशीला सुरुवात झाली आहे. तासभरापासून चौकशी सुरु आहे. आजच श्रद्धा कपूर, सारा अली खानला देखील दुपारी चौकशीला बोलविले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज दीपिका, श्रद्धा आणि साराची चौकशी होणार आहे.