डोणगाव येथे 40 वर्षीय विधवा महिलेचा विनयभंग

यावल : तालुक्यातील डोणगाव येथील एका 40 वर्षीय विधवा महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. डोणगाव, ता. यावल येथे 40 वर्षीय विधवा महिला आपल्या मुलासह राहते. मंगळवारी महिला घरात स्वयंपाक करीत असताना मुलगा बाहेर गेला असताना पावणे दहा वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी फिरोज हुसेन पिंजारी हा विडी पेटवण्यासाठी माचिस मागण्यासाठी आला व महिलेला घरात एकटी पाहून त्याने विनयभंग केला. महिलेने आरडा-ओरड केली असता तिचा मुलगा घरात आला. तेव्हा महिलेच्या मुलास पाहून संशयीत फिरोज हुसेन याने तिथून पळ काढला व जातांना याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीदेखील दिली. पीडित महिला व तिच्या मुलांने यावल पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजित शेख, हवालदार रवींद्र पाटील करीत आहेत.

Copy