डोंबिवली मधील तरुण लोकल मधून पडून वाचला

0

डोंबिवली ( प्रदिप भणगे ) : मुंबईतील लोअर परेल रेल्वे स्टेशनवर एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला आहे. धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असलेला हा तरुण ट्रेन खाली आला. विनोद लक्ष्मण चंदनशिवे असं या तरुणाचं नाव आहे.सदर तरुण डोंबिवलीच्या सोनारपाड्यात राहतो.

डोसा आणि चटणी घेऊन जाणारा हा 30 वर्षीय तरुण आज सकाळी 9 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरुन धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ट्रेन पकडण्याच्या नादात सोबत असलेली चटणी हातातून पडल्याने ती सांडली. त्यामुळेच पाय घसरुन हा तरुण काही सेंकद ट्रेनच्या खाली आला.

परंतु जवळच असलेल्या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवून या तरुणाला फलाटावर खेचलं आणि त्याचा जीव वाचवला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.