डोंबिवलीकर अनुभवणार साहित्यिक मेजवानी

0

डोंबिवली । 90 व्या अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलनासाठी साहित्यनगरी सज्ज झाली असून गुरुवारच्या संमेलनाच्या पूर्वसंध्येने या साहित्य उत्सवाचा शुभारंभ झाला आहे. रविवारपर्यंत रंगणा-या या उत्सवासाठी साकारण्यात आलेल्या पु भा भावे साहित्यनगरीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. भाषण, चर्चा,परिसंवाद,मुलाखती आणि काव्याचा जागर या निमित्ताने डोंबिवलीकराना अनुभवायला
मिळणार आहे.

12 हजार आसनक्षमता तयार
तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यासाठी तयार करण्यात आलेली लेखणी आणि साहित्याचे प्रतीक असणारा सेल्फी पॉईंट साहित्य संमेलनाचा आणि मराठी साहित्याचा इतिहास उलगडणारे साहित्यपार्क आणि संमेलनासाठी तयार करण्यात अलेले सभामंडप साहित्यप्रेमींच्या प्रतिक्षेत सज्ज झाले आहे. गुरुवारी ग्रंथप्रदर्शनासाठी ग्रंथदालन तयार करण्यासाठी वितरक आणि प्रकाशकांना स्टॉल्स सूपुर्द करण्यात आले. याशिवाय 12 हजार आसनक्षमता तयार करण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी लोकांचे कक्ष, पत्रकारांचा कक्ष यांचीही वेगळी सोय करण्यात आली आहे. तसेच तर तरुणाईचा सहभाग वाढवा यासाठी तरुणाईला जास्तीजास्त सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दहा हजार जणांना निमंत्रणे
डोंबिवलीच्या संमेलनामध्ये सर्वाधिक गर्दी व्हावी यासाठी आधिकाधिक लोकांना आमंत्रित करण्यात येत आहे. या साहित्य संमेलनासाठी भारतभरामध्ये दहा हजार जणांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. अंदाजे सहा साडेसहा हजार लोकांची उपस्थिती संमेलनाला असेल असा आयोजकांचा अंदाज आहे.