डोंगर कठारो येथे महिला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबीर

0

डोंगर कठोरा, ता. यावल : येथील कला, वाणिज्य व कॉम्प्युटर अ‍ॅम्प्लीकेशन महिला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिराचा समारोप समारंभ शुक्रवारी डोंगरकठोरा येथे झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मुरलीधर दामू पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मानस सचिव डॉ. राजेंद्रकुमार झांबरे व मुरलीधर खेमचंद पाटील हे होते. शिबिराचे अहवाल वाचन रा.से.योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शकुंतला भारंबे यांनी केले. तर सात दिवशीय हिवाळी शिबिराचे मनोगत शिल्पा भारंबे, सपना बारी, सोनाली रोटे, माधुरी खलसे यांनी आपले विचार प्रकट केले.

प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्रकुमार झांबरे यांनी असे प्रतिपादन केले की, राष्ट्रीय सेवा योजना हे देशातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास व मनोधैर्य निर्माण करण्याचे एकमेव स्त्रोत आहे. तसेच डॉ. प्राध्यापक विनोद मोरे यांनी रा.से. योजनेचे महत्त्व हे एक जीवनाचा अमुलाग्र प्रकाश आहे, असे प्रतिपादन केले. या शिबिरात आनंद तायडे कारटे शिक्षक यांनी कराटे प्रशिक्षण दिले व योग शिक्षक एन.डी. चौधरी यांनी ही प्राणायाम व्यायाम शिक्षण दिले. डॉ. सुषमा पाटील यांनी पुष्प औषधी या विषयावर व्याख्यान दिले. तसेच डॉ. सुनंदा तायडे यांचे क्षयरोग संबंधी व्याख्यान व डॉ. नलिनी वळीकर यांनी रक्तगट तपासणी शिबिर डॉ. हेमंत बर्‍हाटे यांनी स्त्री आणि आरोग्य डॉ. नितीन व संगिता महाजन यांचे स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. सूत्रसंचालन शिल्पा भारंबे तर आभार सोनाली रोटे यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी डोंगरदे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.