Private Advt

डोंगरकठोर्‍यात जुगाराचा डाव उधळला : 10 जुगारी जाळ्यात

यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथे सार्वजनिक जागेवर जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत 10 जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या तसेच तीन दुचाकींसह रोकड मिळून एक लाख तीन हजार 55 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बुधवार, 30 जुन रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डोंगरकठोरा गावातील डोंगरकठोरा ते यावल रस्त्यावरील खंडेराव मंदिराजवळील खुल्या मैदानावर पत्त्त्ते खेळताना जगदीश रतन धनगर (सांगवी), मिलिंद संतोष कोळी (डोंगरकठोरा), तुषार वसंत फेगडे (अट्रावल), प्रदीप रवींद्र भालेराव (कोळवद), गोविंदा सुरेश कोळी (अट्रावल), नितीन पंढरीनाथ चौधरी, (अट्रावल), अन्वर फकीरा तडवी (डोंगरकठोरा), सुशाल अशोक कोळी (डोंगरकठोरा), दिलीप कृष्णा तेली (सांगवी बु.॥), चंदन भीमराव अढाईंगे (कोळवद) यांना अटक करण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलीस अंमलदार सुशील रामदास घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान करीत आहेत.