Private Advt

डोंगरकठोर्‍यातील शेतकर्‍याची आत्महत्या

Dongarkathora Farmer Suicide यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील रहिवासी व शेतकरी विक्रम लालू भिरूड (52) यांनी गावालगत असलेल्या शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

विहिरीत उडी घेवून आत्महत्या
शेतकरी विक्रम भिरूड हे बुधवारी सायंकाळी घरी आले व पुन्हा साडेसहा वाजेच्या सुमारास ते अचानक घरातून बाहेर निघाले आणि गावालगत असलेल्या दिलीप भिरूड यांच्या शेत विहिरीत उडी घेतली. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावल पोलिसांना दिली. रात्री नऊ वाजता त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांकडे सोपवला. दरम्यान, मृत भिरूड यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असापरीरवार आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत सुनील भिरूड यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अशोक जावरे, किशोर परदेशी करत आहे.