डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना सत्यशोधक साहित्य पुरस्कार

0

धरणगाव । साहित्यीक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या ‘परिवर्तनवाद आणि दलित कविता’ या संशोधन ग्रंथाला दीन मित्रककार मुकूंदराव पाटील स्मारक समिती, तरवडी (नेवासा) यांच्यातर्फे दिला जाणारा ‘सत्यशोधक साहित्य पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास प्रमुख प्रा.डॉ.उमेश बगाडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आसबे, सोलापूर विद्यापीठाचे जनसंवाद व पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याच्या डॉ. श्रद्धा कुंभोजकर, समितीचे अध्यक्ष मा. आमदार पांडुरंग अभंग, कॉ. बाबा आरगडे व उत्तमराव पाटील उपस्थित होते. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या या ग्रंथाला यावर्षी ‘अस्मितादर्श वाड्:मय पुरस्कार व महाराष्ट्र अनुवाद परिषदेचा ‘तुका म्हणे साहित्य पुरस्कार’ मिळाले आहेत.