डॉ.रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल कलाम गोल्डन अवॉर्ड प्रदान

1

उरुळी कांचन: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल कलाम गोल्डन अवर्ड 2021 देऊन गौरविण्यात आले आहे. कलाम वर्ल्ड रेकॉर्ड ,द प्लेस ऑफ लेजंडसच्या वतीने बेस्ट सोशल वर्करऑफ़ द इयर, सामाजिक कार्याबद्दल व मल्टी डायमेन्शनल वर्क त्याचप्रमाणे कोरोना पंडेमिकcovid 19, मध्ये केलेल्या अतुलनीय सेवेबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. डॉक्टर रवींद्र भोळे यांनी निष्काम कर्मयोगी कार्य निरंतर, निरपेक्षपणे तसेच सेवावृत्ती कार्य केले आहेत. महात्मा गांधीजींचे अखेरचे शिष्य पद्मश्री डॉमणिभाई देसाई यांच्या विचाराने प्रभावित होऊन विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य राज्यभर केले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक ,अध्यात्मिक, प्रवचना द्वारे व्यसनमुक्ती ,महिला सबलीकरण ,कुपोषण मोहीम ,आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, राष्ट्रीय सेवा योजना ,ने हरू युवा केंद्र द्वारे विविध कार्यक्रम, विविध आरोग्य शिबिरे ,संस्थात्मक कार्य ,अपंग सेवा, नैसर्गिक आपत्ती कार्य ,भूकंपातील महत्त्वपूर्ण सेवा ,दुष्काळग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ,कोरोना पंडेमिक 2020मध्ये रुग्णसेवा, तरुणांना स्फूर्ती देण्याचे कार्य ,हुंडाविरोधी कार्य, मूकबधिर मतिमंद सेवा व अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा, गांधीवादाचा प्रसार व प्रचार, संस्कृतीचे जतन होण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य ,पर्यावरण संतुलनासाठी कार्य, अशा अनेक क्षेत्रांमध्ये गेली पस्तीस वर्षे डॉक्टर रवींद्र भोळे समाजसेवक हे राज्यभर कार्य करीत आहेत .या त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल मॅगसेस अवॉर्ड विजेते पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई यांनी खास मानपत्र डॉक्टर रवींद्र भोळे यांना दिले आहे.त्याचप्रमाणे इंटरनॅशनल ,नॅशनल ,स्टेट, जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. कलाम वर्ल्ड रेकॉर्ड ,द प्लेस ऑफ लेजंडस च्या वतीने देण्यात आलेल्या बेड सोशल वर्कर ऑफ द इयर, इंटरनॅशनल कलाम गोल्डन अवर्ड 2021 प्राप्त झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी डॉ रवींद्र भोळे यांचे कौतुक केले आहे .नुकतेच त्यांचे नामांकन गृह मंत्रालय भारत सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या पद्मश्री 2021 सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे .समृध्द देश घडवण्यासाठी डॉक्टर रवींद्र भोळे ग्राउंड लेव्हल वर ग्रामीण विकासाचे कार्य करीत आहे.

Copy