डॉ.प्रवीण मुंढे आता मुंबईचे पोलिस उपायुक्त

Sharmila Gharge as Superintendent of Police, Nashik ACB भुसावळ : राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या 104 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर लोहमार्गच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे तर नाशिक राज्य गुप्त वार्ता विभागाच्या शर्मिला घार्गे यांची नाशिक एसीबीच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

डॉ.मुंढे आता मुंबईत पोलिस उपायुक्त
जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली होवून त्यांच्या जागी नागपूर लोहमार्गचे एम.राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती तर डॉ.मुंढे यांना नियुक्तीचे ठिकाण मिळालेले नव्हते मात्र आजच्या बदली ऑर्डरनुसार डॉ.मुंढे यांची मुंबई पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, धुळ्यातील अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची नाशिक शहर उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

कुमार चिंता आता गडचिरोलीचे अपर अधीक्षक
जळगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचीदेखील बदली झाली असून ते आता गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.