डॉ. पाटील रूग्णालयात 18 पर्यंत महाशस्त्रक्रिया अभियान

0

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात 18 डिसेंबरपर्यंत मोफत महाशस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्यक्ष रूग्णालयात दाखल होणार्‍या 100 रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे.

आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या विविध अभियानात 1200 हून अधिक रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अयिभानात युरो सर्जरी, पोटाच्या आतड्यांच्या शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, न्युरोच्या शस्त्रक्रिया, बाल शस्त्रक्रिया, कानाचा पडदा बदलविणे, अस्थिरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, मानसोनपचार निदान व व्यसनमुक्ती केंद्र, सर्जिकल ऑन्कोलॉजी, ऑर्थोस्कोपी यासह विविध शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. तसेच हृदयालयामार्फत मोफत एन्जीओग्राफी, एन्जीओप्लास्टी, आणि बायपास शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहे. रूग्णांसाठी एमआरआय, सीटी स्कॅन, आणि सोनोग्राफी तपासणीकरीता विशेष सवलतीची योजना लागू करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधीही मोफत दिली जाणार आहेत. रूग्णालयात प्रत्यक्ष दाखल होणार्या पहील्या 100 रूग्णांवर एमसीएच आणि डिएनबी तज्ञांकडून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तरी रूग्णांनी या महाशस्त्रक्रिया अभियानात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीकरीता रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांच्याशी 9373350009 व जावेद पटेल यांच्याशी 9890747852 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.