डॉ. पवार यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात

0

शिरपूर- शिरपूर येथील श्रीमती एच.आर.पटेल कला महिला महविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. विनय पवार यांनी “फुटबॉल मॅच मधील रेफरी व खेळाडू यांच्या शारीरिक आंतरक्रियांचा होणारा बदल” या विषयावर नवी दिल्ली येथे आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.

राणी लक्ष्मीबाई शारिरीक शिक्षण संस्था, ग्वाल्हेर व मानव संसाधन विकास मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दि. २ फेब्रुवारी ते दि.४ फेब्रुवारी २०१७ दरम्यान खेळाचे विज्ञान व योग या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. विनय पवार यांनी ” फुटबॉल मॅच मधील रेफरी व खेळाडू यांच्या शारिरीक अंतक्रियांचा होणारा बदल” या विषयावर आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. या परिषदेमध्ये जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कोरिया, इंग्लंड आदी देशांमधून संशोधक प्रतिनिधी, प्राध्यापक सहभागी झाले होते.