डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची कोरोना ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ति

0

एरंडोल – येथील सुखकर्ता फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची एरंडोल नगरपालीकेमार्फत कोरोना विरोधी लढ्यासाठी कोरोना ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे.

कोरोना विरोधी लढ्यात सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत ग्रामीण भागात जनजागृती ,आरोग्य यंत्रणेशी व नपा प्रशासनाशी सुसंवाद साधुन सार्वजनिक स्वच्छता ,नपा मार्फत निर्जुन्तीकरण,फवारणी,रुग्णांची आरोग्य चाचणी ,अती जोखमीचे कार्य करणार्या नपा कर्मचारी वर्गाला सरंक्षक साहित्याचे वाटप ,पीपीकिट वापराबाबत मार्गदर्शन,जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत सुचना ह्याविषयी कार्य करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे एरंडोल शहरात सामाजीक संदेश माध्यमाद्वारे प्रभावी जनजागृती ,विविध वृत्तपत्रीय कोरोना विषयी लेख असे योगदान आजपर्यंत दिले आहे .

सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरातील अल्प उत्पन्न असलेल्या कूटुंबातील एक हजार नागरिकापर्यंत प्रत्येकी एक किलो तांदूळचे वाटप केले आहे. शहरातील व्यापारी वर्गासाठी 100 फेसशील्डचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाविरोधी लढ्यासाठी डॉ.गीतांजली ठाकूर व त्यांच्या सुखकर्ता फाऊंडेशन ने केलेल्या धडपडीची दखल घेऊन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियूक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी ह्यांनी विशेष पत्रकाद्वारे ही नियुक्ति केली आहे. ह्या भयंकर अश्या कोरोनाच्या लढ्यात लोकसहभागाची गरज आवश्यक असल्याने सुखकर्ता फाऊंडेशन सारख्या इतर संस्थांनी यथाशक्ती असे योगदान द्यावे असे आवाहन केले आहे .

Copy