डॉ. आ. ह. साळुंखे यांना समताभुषण

0

मुंबई :आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते,माजी मंत्री कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी भंडारदरा येथे धम्मयात्रेचे आयोजन केले जाते. या दिवशी राज्यातील आंबेडकरी चळवळीतील बहुसंख्य कार्येकर्ते व रुपवते प्रेमी आवर्जून उपस्थित राहतात.

दादासाहेब म्हणत, गावकुसाच्या बाहेरचे आणि गावकुसाच्या आतले समतावादी यांची एकजूट हाच दलित अत्याचार रोखण्याचा टिकाऊ मार्ग आहे.त्यांच्या या विचारांना अनुसरुन या वर्षीचा समताभुषण पुरस्कार ज्येष्ठ समतावादी कृतिशील विचारवंत डाँ.आ.ह.साळुंखे आणि समाजभुषण पुरस्कार ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व ग्रंथ व संग्रहक रमेश शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब रुपवते यांच्या 92 व्या जन्मदिनी मंगळवार दि.28 फेब्रुवारी 2017 रोजी भंडारदरा, अहमदगर येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रेमानंद रुपवते भुषविणार असून सन्मानीय पाहुणे मा.आ.मधुकरराव पिचड आणि मा.आ.वैभव पिचड उपस्थित राहणार आहेत.