डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कारासाठी प्रस्ताव

0

जळगाव : आरोग्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ.आनंदीबाई जोशी विशेष पुरस्कार देण्यात येत असतो या पुरस्कारासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. आरोग्य केंद्रांनी जिल्हा परिषदेकडे यासाठी प्रस्ताव पाठवावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. बुधवारी जिल्हा परिषदेत आरोग्य समितीची सभा सभापती सुरेश धनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलीयात ही माहिती देण्यात आली.
बैठकीत हिवतपा, कुष्ठरोग, कुटुंब कल्याण, साथी रोग याचा आढावा घेण्यात आला. दरम्यान जीर्ण झालेल्या इमारतीची पुर्नबांधणीस मंजुरी आणि अपुर्ण अवस्थेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामे लवकरच पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी रावेर तालुक्यातील गारखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अपुर्ण असल्याने संबंधीत ठेकेदाराला नोटीस देण्यात आली आहे. ‘कायाकल्प’ योजनेत भडगाव तालुक्यातीलइ पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रास सर्वसमावेशक तपासणीत उत्कृष्ट असल्याने 2 लाखाचे बक्षिस देण्यात आले. सभेत जिल्हा परिषद सदस्यांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हृदय तपासणी शिबीर
शालेय आरोग्य तपासणी योजनेअतंर्गत हद्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले यात 147 विद्यार्थ्यापैकी 136 विद्यार्थ्याची टुडी इको तपासणी करण्यात आली. त्यात 6 विद्यार्थ्यांवर हद्या संबंधी यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली. यावेळी डॉ. आशुतोष सिंग, डॉ.श्रीनिवासन, डॉ.सजंय बाविस्कर, डॉ.वर्षा वाघमारे यांचे अभिनंदन करण्यात आले.