डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध

0

भुसावळ । धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिरोग शास्त्र विभागातील निवासी डॉक्टरवर झालेल्या अमानुष व जीवघेण्या भ्याड हल्ल्याचा भुसावळ येथील आयएमए या वैद्यकीय संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. वारंवार डॉक्टरांवर होणारे असे हल्ले ही चिंताजनक बाब आहे. अशा घटनांमुळे डॉक्टरांमध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे व त्यामुळे त्यांची मनःस्थिती चिंताजनक असल्याचे व्यक्त केले.

हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी
तरी धुळे येथील सर्व हल्लेखोरांवर कडक कारवाई होवून त्यांना जबर शिक्षा व्हावी व भविष्यात अशा घटना होणार नाही, असा कडक कायदा करावा जेणेकरुन सर्व डॉक्टरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होवून ते चांगल्या प्रकारे उपचार करु शकतील.