डेव्हिड काळे यांना समाजरत्न पुरस्कार

0
तळेगाव दाभाडे : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने समाजरत्न पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचे पुरस्कार नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. डेव्हिड काळे, चंद्रकांत उजागरे व सिरील दारा हे या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. हा कार्यक्रम मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, माजी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस सुखानंद साब्दे, सेवाकर सहआयुक्त डेव्हिड अल्वारीस, प्रा.बाबा खरात, जेष्ठ साहित्यिक लाँरेन्स गायकवाड, सुनिल आवळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पसंख्यांक परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पाळकवर्ग व बिशप उपस्थित होते.
Copy