डॅनियल व्हिटोरीला रंगना हेराथने टाकले मागे

0

गॉल । श्रीलंका व बांगलादेश याच्या कसोटी सामने सुरू आहे. श्रीलंकेच्या संघासाठी हा सामना विश्‍व रेकार्ड बनविणारा ठरला त्यात तो रंगना हेराथ या डावखूर्‍या गोलंदाजीसाठी महत्वाचा व विशेष होता. हेराथ कसोटी क्रिकेटमधला सर्वात यशस्वी डावखूरा गोलंदाज बनला आहे.त्याने न्यूझीलंडचा दिग्गंज डावखूरा फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरीला मागे टाकले आहे. व्हिटोरीने 362 गडीबाद केले आहे.तर हेराथने आजपर्यंत 79 कसोटीत 366 गडीबाद केले आहे. या सामन्यात 59 धावा देऊन 6 विकेट घेत 29 वेळा एखाद्या मॅचमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम हेराथने केला. यासोबत त्याचा समावेश दिग्गजांच्या श्रेणीत झालाय. मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, रिचर्ड हेडली आणि अनिल कुंबळे यांच्या श्रेणीत तो पोहोचला आहे. बांगलादेशविरूद्ध गॉलमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 259 धावांनी विजय मिळवला. या विजयात श्रीलंकेचा फिरकी गोललंदाज रंगना हेराथने महत्वाची भूमिका बजावली.