डॅझलिंग स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांची धम्माल

0

जळगाव : गोदावरी सीबीएसई इंग्लीश स्कुलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुणांचा आविष्कार सादर करत जल्लोष केला. तर गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी सीबीएसई इंग्लिश स्कुलमध्ये डॅझलिंग वार्षिक स्नेहसंमेलनात पहिल्या दिवशी ऑर्केस्ट्रॉचे उदघाटन प्रमुख अतिथी सहायक पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील तर 22 रोजी जळगाव महानगरपालीका आयुक्त जिवन सोनवणे यांचे हस्ते दिपप्रज्वलन व शारदा पूजनाने करण्यात आले. यावेळी माजी खा. डॉ उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील,प्रीन्सीपल निलीमा चौधरी,डॉ उल्हास पाटील सीबीएसई भुसावळच्या प्रिन्सीपल अनघा पाटील,सावदाच्या प्रिन्सीपल भारती महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या दिवशी हिंदी, इग्रजी, मराठी गितांचा नजराणा ऑर्केस्ट्रामध्ये सादर करण्यात आला. तर नर्सरी व ज्युनियर के.जी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. वंदे मातरम्, प्लुटो हन्नी बन्नी, पंजाबी थिम हीपहॉप, मल्हारी, पिंगा ग पोरी पिंगा, कोळीनृत्य, भांगडा, या गीतांवर नृत्य विद्यार्थ्यांनी जोरदार धम्माल केली. तसेच कथ्थक, शिव तांडव, गरबा नृत्यही विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी सीबीएसई स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले. यावेळी शालांत परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन व आभार ऋतुजा या विद्यार्थीनीने मानले.