डी.वाय.पाटीलमध्ये वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन

0
वन्यजीव संवर्धनाबाबत जागृती होण्यासाठी
आकुर्डी : वन्यप्राण्यांबद्दल सर्वसामान्य लोकांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन्यजीव सप्ताह हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे विविध शाळांमधून आणि महाविद्यालयांमधून वन्यजीव सप्ताहाचे साजरा होतो. डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात दि.1 ते 7 सप्टेंबर रोजी वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहीती तसेच त्यांच्या संर्वधनाची जागृती निर्माण व्हावी, या मुख्य उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहाचे उद्घाटन भीमाशंकर येथील वन अधिकारी शिवाजी फंटागरे यांच्या हस्ते करण्यात आले. फटांगरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भारतातील वनांची माहीती दिली. त्याचप्रमाणे भारतातील अभयारण्ये तसेच राष्ट्रीय उद्याने, त्यामध्ये आढळणारे प्राणी-पक्षी यांचे पी.पी.टी.द्वारे सादरीकरण देखील केले. विद्यार्थ्यांना माहिती नसलेल्या पक्षांची देखील यावेळी फोटोच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती दिली.
दीपक सावंत यांचे मार्गदर्शन
शिवाजीराव फटांगरे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्य गौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी सन्मानपत्र, पुणेरी पगडी घालुन फटांगरे यांचा सत्कार करण्यात आला. सप्ताहाच्या दुसर्‍या सत्रात बहिणाबाई चौधरी उद्यानाचे संचालक दीपक सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभयारण्यात गेल्यावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी तसेच विविध प्राणी-पक्षी यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीच्या विश्‍वस्त डॉ.स्मिता जाधव तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा.तृप्ती पाटील, प्रा.भाग्यश्री शिंदे, तसेच प्राणीशास्त्र विभागातील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सतीश ठाकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.स्नेहल शिंदे यांनी केले तर आभार प्रा.प्रणिता चौधरी यांनी मानले.
Copy