डीजेला दुचाकीचा अडथळा : दोघांना चौघांची मारहाण

यावल : तालुक्यातील किनगाव खुर्द गावात डीजेचा दुचाकीचा अडथळा निर्माण झाल्याने दोघांना चौघांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. किनगाव खुर्द येथील रहिवासी समाधान पांडूरंग लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेजारी राहणारे सुनील गोपाल कोळी यांच्या मुलाचे लग्न होते व मंगळवारी डीजेचा कार्यक्रम होता. घराजवळ अंगणात लावलेली दुचाकी डिजेच्या वाहनास अडथळा ठरल्याच्या कारणांवरून सुनील गोपाळ कोळी, पिंटु अशोक कोळी, अशोक गोपाळ कोळी व शरद अशोक कोळी यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी फिर्यादी व त्यांचा मुलगा राहुल यास लाथा बुक्यांनी मारहाण केली. लग्नात आलेल्या 20 ते 25 अनोळखी इसमांनी भांडण सोडवले. या प्रकरणी चौघांसह त्यांच्या कुटुंबा विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.