डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन रुग्णालयात

0

चेन्नई – डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना काल रात्री अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. किडनीचा आजार बळावल्याने स्टॅलिन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तपासणी झाल्यानंतर स्टॅलिन यांच्या काही टेस्ट करण्यात येतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर स्टॅलिन यांची डीएमकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.