डाबेराव यांना शिपायासह अटक

0

जळगाव। जिल्हा कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव आणि पोलीस शिपाई बापू आमले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने .रंगेहात लाच स्वीकारताना अटक केली आहे. याबाबत कारागृहातील कैद्याला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेसाठी पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. संबधित कैद्याच्या नातेवाईकांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्याकडे तक्रार केली यावरून तक्रादाराने केलेल्या तक्रारी नुसार शुक्रवारी 5 मे रोजी सकाळी 8 वा. दोन हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या सह पथकाने अटक केली

उपअधिक्षक पराग सोनवणे यांची कामगिरी
जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक म्हणून रुजू झालेले पराग सोनवणे यांनी लाच घेणार्‍या अनेक आधिकारीवर्गाला अटकाव केला आहे. तसेच तापी पाटबंधारेचे अभियंता, महावितरणचे अभियंता, मनपा उपायुक्त, समाज कल्याणचे वरिष्ठ अधिकारी आदी सरकारी बाबूंन वर कार्यवाही केली आहे.

अनेक दिवसापासून पासून रडारवर
जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस जिल्हा सुधार कारागृह असून; काळा पैसा घेण्याच्या बदल्यात कैद्यांना प्रतिष्ठित सोयी-सुविधा पुरविण्यासाठी कारागृहातील अधिकारी अनेक दिवसा पासून नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असताना. जिल्ह्यातीलच प्रसारमाध्यमांनी वृत्तपत्रांनी अनेक बेकायदेशीर चालणार्‍या घटना उघडकीस आणल्या होत्या. मात्र कायद्यानुसार पुरावा आवश्यक असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून रंगेहात रक्कम घेतांना कार्यवाही करण्यात आली आहे.

अधिकार्‍याचे बेकायदेशीर काम
महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पदाचे अधिकारी प्राप्त प्रांताधिकार्‍यांची नेहमी वास्तव असताना या भागात बेकायदेशीर कामांना पाठबळ देण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय असताना जिल्हा कारागृह देखील असून ह्याच ठिकाणी लाचलुचपत विभागाने कारागृह अधीक्षक ,पोलीस शिपाई यांच्या याना रंगेहात पकडून कार्यवाही केली आहे.

तीन दिवसांपूर्वी तक्रार
संबधित कैद्याच्या नातेवाईकांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी तक्रार केली होती. तक्रारीची वास्तवता जाणल्या नंतर दोघांविरूद्ध सापळा लावण्यात आला. लाचेच्या मागणीनुसार नातेवाईक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक डाबेराव यांच्याकडे पोहचले होते. सकाळी 8 वाजेच्या सुमारास दोन हजार रुपये घेतांना पथकाने दोघांना ताब्यात 2घेतले. दोघा संशयित आरोपीना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांची तपासणी करण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.