डाऊन महानगरीत परप्रांतीय प्रवाशाचा मृत्यू

3

रावेर : डाऊन महानगरी एक्स्प्रेसमधून कुटुंबासह मुंबई ते वाराणसी जात असलेल्या 52 वर्षीय प्रवाशाचा रेल्वेतच मृत्यू झाल्याने रावेर रेल्वे स्थानकावर गाडी थांबवण्यात आली होती मात्र कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही मृतदेहाला हात लावत नसल्याने पत्नी व मुलांना मृतदेह खाली उतरवला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मयत प्रवासी कर्करोगाच्या आजाराने पीडीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर कोरोना संशयीत म्हणून या रुग्णावर उपचार करण्यात आल्याचे समजते. लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी सांगितले.

Copy