डांभूर्णी येथील शेतमजूराची गळफास घेऊन आत्महत्या

0

यावल । तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवाशी चंद्रकांत रामराव पाटील वय 45 यांनी 11 रोजी सकाळी आत्महत्या केल्याची घटना उडघकीस आली. उंटावद येथून जवळ असलेल्या दिनकर केशवराव पाटील यांच्या शेतात ट्युबवेलच्या काम सुरु असून शेतात मोटार पंप काढण्याच्या लोखंडी घोडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकर्‍यांच्या वाहन चालकाच्या निदर्शनात आल्यावर त्याने उंटावद गावातील पोलीस पाटील यांना कळवली. पोलीस पाटीलसह गावकर्‍यांनी शेताकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक बळीराम हीरे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र साळी व पो.हे.कॉ. विकास सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पश्चात पत्नी व अल्पवयीन 2 मुल असा
परिवार आहे.